पुस्तकाबद्दल
‘नवरा आणि बायको’ हा विनोदाच्या कारखान्यातला कच्चा माल ! त्यातून जी विनोदनिर्मिती होते ती वैश्विक असते. ‘पुरुष हा क्षण काळचा गुर्रर्र असून अनंत काळाचा ‘म्यांव’ असतो हे त्रिकालबाधित सत्य असून या एका वाक्यासाठी मला ‘ऑस्कर’ मिळायला हरकत नाही!’ असा लेखकाचा दावा आहे आणि त्यात तथ्यही आहे. हे पुस्तक वाचताना आपल्या गडगडाटी हसण्याला आवर घालणे गुरगुरणारीलाही शक्य होणार नाही. ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ असे म्हणताना चांगल्या साहित्याचा ‘आनंद’ घेणे आणि जीवन सुकर करणे आवश्यक आहे. विनोदी साहित्यातील हे ‘आधुनिक देशपांडे’ आपल्या चेहऱ्यावरील हास्य फुलवतील हे मात्र नक्की.
– घनश्याम पाटील
Reviews
There are no reviews yet.