खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी

 100.00  80.00

या संग्रहाचं पहिलं महत्चाचं वैशिष्ट्य म्हणजे संपन्न आशय ! कोणतीही साहित्यकृती संपन्न आशयाशिवाय ‘साहित्य’ पदवीला पोहोचू शकत नाही. जीवसृष्टी आणि निसर्गभांडार हा या संग्रहातील संपन्न आशय आहे. या संग्रहाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे संपन्न आशयाचा उत्कृष्ट आविष्कार! आशय कितीही संपन्न असला तरी त्याचा आविष्कार हा प्रभावी असावा लागतो, लेखकाने हा आविष्कार! प्रभावीपणे शब्दांकित केला आहे.

या संग्रहात तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ‘प्रासादिकता’. या बालकथा मुलांसाठीच आहेत. भाषा सहज, सोपी, सुलभ हवी, हा प्रसादगुण भाषेमध्ये आहे.या संग्रहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणाजे मुलांचं भावविश्व प्रभावी रीतिने उलगडून दाखविण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

500 in stock

पुस्तकाबद्दल

पु. ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की,अवघड लिहिणं सोपं असतं, सोपं लिहिणं फार अवघड असतं! मुलांसाठी सोपं लिहिण्याचं अवघड काम डॉ. कैलास दौड यांनी या संग्रहाद्वारे केलं आहे. त्यांचं लेखक म्हणून आणि घनश्याम पाटील यांचं प्रकाशक म्हणून अभिनंदन! बालसाहित्यात मोलाची भर घालणारं पुस्तक आता वाचक वाचणार आहेत. शुभेच्छा!

डॉ. न. म. जोशी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ

अधिक माहिती

लेखक

डॉ. कैलास दौंड

पाने

48

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी”

Your email address will not be published. Required fields are marked *