पुस्तकाबद्दल
Mana Darpana by Pralhad Dudhal प्रल्हाद दुधाळ लिखित मना दर्पणा
₹ 100.00 ₹ 80.00
मानवी मन म्हणजे अलीबाबाची गुहाच! या गुहेत काय काय दडलंय हे भल्याभल्यांना कळत नाही. इतरांना सोडा पण खुद्द त्या व्यक्तिलाही माहीत नसतं की आपण मनात काय काय साचवलंय? या ‘साचले’पणातूनच अनेक समस्या उद्भवतात. म्हणूनच मन प्रवाही असायला हवं. त्यासाठी लागतो मनाचा निर्मळपणा, निरागसपणा! तोच दुर्मीळ होत चालल्यानं समाजस्वास्थ्य धोक्यात आलं आहे.
एखादी ‘मनात’ली गोष्ट सांगितली की, किती हलकं हलकं वाटतं! तरीही अनेकजण हे ‘मणामणा’चं ओझं अकारण सोबत वागवतात. त्यातूनच शारीरिक, मानसिक व्याधींना सामोरे जातात. आयुष्याचा अक्षरशः नरक होतो. का? तर मनातली ही घुसमट बाहेर न पडल्यानं! अशाच मनामनांचा आरसा दाखवण्याचं काम या पुस्तकाद्वारे केलंय प्रल्हाद दुधाळ यांनी! म्हणूनच हे पुस्तक वाचायलाच हवं.
10 in stock
Mana Darpana by Pralhad Dudhal प्रल्हाद दुधाळ लिखित मना दर्पणा
लेखक | प्रल्हाद दुधाळ |
---|---|
पाने | ९६ |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.