माझी साप्ताहिकी

 300.00  240.00

अ‍ॅड. प्रभाकर येरोळकर या हरहुन्नरी आणि अत्यंत प्रतिभासंपन्न लेखकाचे विविध विषयांवरील विचारमंथन वाचकांना नवी दृष्टी देणारे, त्यांना विचार करायला भाग पाडणारे, व्यवस्थेतील त्रुटीवर नेमके भाष्य करणारे आहे. चोखंदळ वाचक आणि आस्वादक समीक्षक, लेखक या नात्याने त्यांचे ‘चपराक’ परिवाराशी ऋणानुबंध होते. लेखक शरीराने गेला तरी विचाराने अजरामर असतो. त्याने वेळोवेळी केलेले समाजचिंतन, घेतलेल्या भूमिका, व्यक्त केलेले विचार हीच त्याची मोठी ठेव असते. अ‍ॅड. येरोळकरांचे चरित्र आणि चारित्र्य या दृष्टीने संपन्न होते.

500 in stock

पुस्तकाबद्दल

माझी साप्ताहिकी
लेखक – अ‍ॅड. प्रभाकर येरोळकर
पाने – 224 मूल्य 300

एक वाचकप्रिय स्तंभलेखक अशी ओळख असलेल्या अ‍ॅड. प्रभाकर येरोळकर यांनी विपुल लेखन केले. 2014 साली ज्युलियस क्रँडॉल हॉलिक यांनी लिहिलेल्या ‘अपना स्ट्रिट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केला. 2016 ला त्यांचे ‘आस्वाद आणि आक्षेप’ हे निवडक स्तंभलेखाचे पुस्तक प्रकाशित झाले. सहज, सोप्या आणि रोखठोक शैलीत लेखन करण्यासाठी ते सुप्रसिद्ध होते. ग्रामीण परिसर, तिथली भोळीभाबडी माणसे, त्यांची भाषा, त्यांचे स्वभावविशेष आणि त्यातले कंगोरे नोंदविणारा, काहीशा विनोदी शैलीतला ‘पंचनामा’ हा कथासंग्रहही प्रकाशित झाला.

अधिक माहिती

लेखक

अ‍ॅड. प्रभाकर येरोळकर

पाने

224

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझी साप्ताहिकी”

Your email address will not be published. Required fields are marked *