पुस्तकाबद्दल
मोरूच्या साखरपुड्याची तारीख जवळ आली होती आणि त्यासाठी पुण्याला जायचं होतं. रजा हवी होती पण नवीन आलेले साहेब अतिशय खडूस होते. मारूला त्यांच्याकडे जायची भीती वाटत होती. बाकीची माणसं बिनधास्त रजा घेत होती. स्टेनो तर चमचेगिरी करून रजेचा अर्ज न टाकता पुण्याला जाई. मोरू मात्र दिवास्वप्ने पाहत कुढत होता. आचार्य अत्रे स्वप्नात आले तेव्हा त्याने त्यांना हे गार्हाणं सागितलं. त्यावर अत्रे म्हणाले की, ‘‘स्टेनो तुझ्या साहेबांची नायिका आणि इतरांची खलनायिका आहे. साहेबांसारखा खडूस माणूस गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही.’’ मोरूचं गार्हाणं ऐकून पुल म्हणाले, ‘‘अरे तिची लघळ संस्कृती, आपली ती अघळपघळ संस्कृती.’’ वपु म्हणाले, ‘‘एक क्षण चमचा हलविण्याचा. बाकीचे शेपूट हलविण्याचे.’’
Reviews
There are no reviews yet.