पुस्तकाबद्दल
गावमाती, बाप आणि ईश्वर यांच्या भक्तीत रमलेली माधव गिर यांची कविता ग्रामीण जीवनाचे अस्सल रंग अभिव्यक्त करते. शेती आणि शेतकरी हे या कवीच्या कवितेचे जिव्हाळ्याचे विषय आहेत कारण बापाची नाळ अपरिहार्यपणे शेतीशी जुळून आहे आणि कवीची नाळ बापाच्या रक्तामासासह त्याच्या वेदनेशी जुळून आहे. या संग्रहातील ‘बापा’च्या कविता त्यामधील अस्सल अनुभूतीमुळे लक्षणीय ठरल्यात. मराठी साहित्यात आई आणि मायविषयक कवितांचे संग्रह प्रसिद्ध व्हावेत एवढी श्रीमंत मातृत्वाच्या वाट्याला आली पण ‘बाप’ मात्र मराठी कवितेत उपेक्षितच राहिला. माधव गिर यांच्या कवितेतील बाप हा कष्टकरी शेतकरी आहे. त्यामुळे त्याच्या वेदना निसर्गाशी व परिस्थितीशी जुळून अभिव्यक्त झाल्यात.
Reviews
There are no reviews yet.