निर्णय Nirnay

Original price was: ₹ 130.00.Current price is: ₹ 104.00.

या प्रामुख्याने माणसाच्या कथा आहेत. त्यात सहृदयता, नातेबंधातील ताणतणाव, घुसमट, पेचपसंग व त्या प्रश्नांची सोडवणूक जशी आहे तसेच काही ‘बीज’सारख्या अंगावर येणार्‍या, हेलावून सोडणार्‍या शोकात्मकही आहेत. ‘बीज’मध्ये लहान मुलांचे भावविश्वही अत्यंत सामर्थ्याने पुढे येते. ‘मोहमाया’सारख्या कथेत माता-पुत्र संबंधातील चढ-उतार आणि परकाच कसा पुत्रवत होऊन ते तुटू पाहणारे संबंध पुन्हा सांधण्यास कारणीभूत होतो याचे हृद्य वर्णन आहे.

Out of stock

ISBN: 9789386421302 Category: Tags: ,

पुस्तकाबद्दल

या प्रामुख्याने माणसाच्या कथा आहेत. त्यात सहृदयता, नातेबंधातील ताणतणाव, घुसमट, पेचपसंग व त्या प्रश्नांची सोडवणूक जशी आहे तसेच काही ‘बीज’सारख्या अंगावर येणार्‍या, हेलावून सोडणार्‍या शोकात्मकही आहेत. ‘बीज’मध्ये लहान मुलांचे भावविश्वही अत्यंत सामर्थ्याने पुढे येते. ‘मोहमाया’सारख्या कथेत माता-पुत्र संबंधातील चढ-उतार आणि परकाच कसा पुत्रवत होऊन ते तुटू पाहणारे संबंध पुन्हा सांधण्यास कारणीभूत होतो याचे हृद्य वर्णन आहे. ‘लोकल’ या कथेत नात्यांमधील घुसमट येते. ‘निर्णय’ या शीर्षक कथेत भावंडातील वयाच्या तफावतीमुळे त्यांच्यात आलेला दुरावा एका प्रसंगाने कसा जिव्हाळ्यात बदलतो हे अत्यंत सुरेखपणे दाखवले आहे आणि प्रेमाची महती काय आहे हे वाचकांच्या मनावर बिंबवण्यात ही कथा यशस्वी होते.