पुस्तकाबद्दल
डॉक्टर बी. व्ही. कुलकर्णी यांनी आपल्या अस्सल भावना मोठ्या धिटाईने शब्दबद्ध केल्या आहेत. शृंगार कविता लिहिताना त्यांनी शब्दाचा तोल मोठ्या नजाकतीने पेलला आहे. काही कविता प्रसंगानुरूप आहेत. सभोवतालच्या निसर्गाशी एकरूप होताना काही वेगळे फुलपंखी चित्र अनुभवायला मिळते. सोपी साधी भाषा आणि सहज मांडणी हे या कवितांचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा कविची भावना आणि अनुभव वाचकाला स्वतःचा वाटतो आणि तो अनुभव सर्वकालिक होतो, त्यावेळी ती चांगली साहित्यकृती होते. वेगळ्या धाटणीची ही भावकविता रसिक वाचकांना नक्कीच आवडेल.
श्रद्धा बेलसरे खारकर
निवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र राज्य
Reviews
There are no reviews yet.