आतला आवाज

 150.00  120.00

आजच्या पिढीकडे असलेलं आत्मभानं पाहायचं असेल तर बारामती तालुक्यातील मळदसारख्या छोट्या गावातील प्रतिभावंत कवी विनोद खटके यांचा ‘आतला आवाज’ समजून घेतला पाहिजे. सामान्य माणूस आणि त्याची सुख-दुःखे केंद्रस्थानी असल्यानं खटके यांची कविता शाश्वत सत्याच्या मार्गावरून चालते. या कवितांतून जीवनाचे सगळे रंग उलगडत जातात. विनोद यांच्या लेखणीची नाळ शेती आणि मातीशी घट्टपणे जोडलेली असल्यानं या व्यवस्थेतल्या तरूणाईचा शब्दहुंकार यातून दिसून येतो.

झरे हे मनाचे राहो प्रवाही, घडो ना चुकीचे या हातून काही

नको नको ते वाहून जावे, करुणेचे गाणे आतून यावे !

अशा शब्दांतून जणू माउलींचे विश्वात्मक पसायदानच आजच्या भाषेत मांडले आहे. ज्याला इतरांची व्यथा-वेदना कळते आणि ज्याच्या हृदयाला करुणेचा पाझर फुटतो तो कवी मानवतेचे नंदादीप तेवत ठेवतो. विनोद खटके याच साहित्य प्रवाहाचं दमदार प्रतिनिधित्व करतात.

480 in stock

पुस्तकाबद्दल

‘सत्य लिहिणे वादळाला बिलगणे जसे झुंजणे हा लेखणीचा छंद झाला पाहिजे’ लेखणीसाठी असं मागणं मागणाऱ्या आणि हवे कशाला घेणे देणे, केवळ आता समजून घेणे, सरले काय, उरले काय, हिशोब असले सोडून देणे

असं सांगणाऱ्या या लढवय्या कवीचा हा ‘आतला आवाज’ सामान्य माणसाच्या, मनाला उभारी देईल आणि त्याच्यात स्वाभिमानाची मशाल पेटवेल हे नक्की! शब्दांनाच सर्वस्व मानणाऱ्या एका कवीचं यापेक्षा मोठं यश ते कोणतं ?

घनश्याम पाटील,

लेखक, प्रकाशक आणि संपादक

अधिक माहिती

कवी

विनोद खटके

पाने

96

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आतला आवाज”

Your email address will not be published. Required fields are marked *