अधिक माहिती
लेखक | नागेश शेवाळकर |
---|---|
पाने | 64 |
Publisher |
₹ 250.00 Original price was: ₹ 250.00.₹ 200.00Current price is: ₹ 200.00.
कृष्ण अवतारातली एक कथा आहे. एकदा नारदमुनी अचानक श्रीकृष्णाच्या महालात आले. त्यावेळी ‘ते पूजा करत आहेत,’ असे सांगण्यात आले. दस्तुरखुद्द भगवान श्रीकृष्ण कुणाची पूजा करतात? हे पाहण्याचे औत्सुक्य वाढल्याने नारद थेट आत गेले. पाहतात तो काय! देव्हाऱ्यात तिांच्याच प्रतिमा होत्या. पहिली होती श्रीहनुमानाची, दूसरी खुद्द नारदाची आणि तिसरी गरुडाची !
आश्चर्यचकित होऊन याचे कारण विचारल्यावर श्रीकृष्णाने सांगितले, ‘तुम्ही तिघेच असे आहात की तुम्ही मला कधीच काही मागितले नाही.’ भक्तीच्या परंपरेत देवालाही ज्याची पूजा करण्याचा मोह होतो असे श्रेष्ठ भक्त, चिरंजीवी असलेले श्रीहनुमान आपल्या सर्वांसाठी आदर्शांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.
श्रीराम चरित्रात हनुमानाची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. बाल्मिकी रामायणासह जगभरातील असंख्य रामकथांत हनुनानाच्या कितीतरी सुरस, रम्य कथा वाचायला, ऐकायला मिळतात. कलियुगातही हनुमानाच्या कृपेची अनेक उदाहरणे जागोजागी प्रत्ययास येतात. स्वामीनिष्ठ हनुमंतरायाची भक्ती, शक्ती अत्यंत प्रेरक आहे. आपल्या आदर्शाची उजळणी म्हणून श्री. नागेश शेवाळकर यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाने लिहिलेले हे चरित्र विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील सर्वच घटकांसाठी महत्त्वाचे आहे. आवर्जून वाचावे, आपल्या संग्रहात ठेवावे आणि अनेकानेकांना भेट द्यावे असे हे पुस्तक म्हणजे ‘पवनपुत्र हनुमान !’
– घनश्याम पाटील
500 in stock
लेखक | नागेश शेवाळकर |
---|---|
पाने | 64 |
Publisher |
Special Offer: 10% Discount* कमीत कमी ३०० रुपयांच्या खरेदीवर पुस्तके मोफत घरपोच मिळवा*. Dismiss
Reviews
There are no reviews yet.