प्रभातरंग

 300.00  240.00

अनेक मोठमोठे ग्रंथ एकेका बैठकीत वाचून काढणारे ज्ञानसाधक, तीन-तीन तासांचा सिनेमा उत्कंठतेने पाहणारे प्रेक्षक कधी काळी आपल्याकडे होते, हे आजच्या पिढीला सांगितले तर आश्चर्य वाटावे अशी परिस्थिती आहे. अवघ्या तीस सेकंदाच्या रिल्सवर खुश होणारी पिढी कोणत्याही चांगल्या कामात काही मिनिटेही लक्ष केंद्रित करु शकत नाही. अर्थात याला काही अपवाद निश्चित आहेत मात्र बदलत्या जीवनशैलीतील हे बदल दुर्लक्षून चालणार नाही.

अशावेळी ‘रिल्स लाईफ’ आणि ‘रियल लाईफ’ यातील सीमारेषा ओळखून जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांना, स्वभावाच्या पैलूंना स्पर्श करत वृत्ती आणि प्रवृत्ती अधोरेखित करणारे लेखन रवींद्र खंदारे यांनी अतिशय नेमकेपणाने केले आहे. यातून आपल्याला चांगल्या- वाईटातील फरक कळतो. ताणतणाव दूर सारले जातात. सकारात्मक वृत्ती वाढीस लागते. स्वार्थ गळून पडतो आणि ‘स्व’ अर्थ उमगतो. यातील कोणताही लेख अवघ्या अडीच-तीन मिनिटात वाचून होणार असल्याने त्यासाठी फार वेळही द्याव्या लागणार नाही. ज्यांना आपले आत्मिक बळ वाढवायचे असेल त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे.

– घनश्याम पाटील

500 in stock

पुस्तकाबद्दल

माणसाने बुद्धिच्या जोरावर अनेक प्रकारचे शोध लावले. त्या शोधांनी मानवी जीवन अधिक सुखी, समाधानी, आनंदी होईल असे वाटले; पण संशोधनाच्या प्रक्रियेने माणसांच्या जीवनात जितक्या सुख-सुविधा आल्या तितकेच ताणतणावही निर्माण झाले. त्यातून माणसाचे संबंध अधिक सैल होत गेले. आनंदाच्या वाटांना माणसं पारखी झाली. संवादाची भूकही आटत चालली आणि आभासी भुकेने माणूस सुखाचा शोध घेऊ लागला. माणसे दिवस-रात्र धावपळ करू लागली. गरजेपेक्षा अतिरिक्त पैसा हाती आला पण सुखाचा शोध लागला नाही. प्रभात ते सायंकाळचे रंग उडत गेले. अशावेळी माणसाच्या जीवनात पुन्हा एकदा रंग भरले जावेत आणि त्यासाठीच्या प्रकाशवाटांनी माणसांचे जीवन उजळून निघावे, पुन्हा एकदा सर्वांना आनंदाच्या वाटा सापडत जाव्यात यासाठी रवींद्र खंदारे यांचे ‘प्रभातरंग’ वाचकांना निश्चितपणे वाट दाखवेल असा विश्वास वाटतो.

– संदीप वाकचौरे
सुप्रसिद्ध लेखक आणि समीक्षक

अधिक माहिती

लेखक

रवींद्र खंदारे

पाने

168

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रभातरंग”

Your email address will not be published. Required fields are marked *