वेध अंतर्मनाचा

 250.00  200.00

कोकणच्या गावमातीची स्पंदने आपल्या शब्दांतून उजागर करणारा संवेदनशील लेखक म्हणून जे. डी. पराडकर हे नाव आता मराठी साहित्यात सर्वश्रुत झाले आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून कोकणला शब्दांच्या माध्यमातून चित्रांकित केले आहे. कोकणचा निसर्ग, तेथील माणूस, त्याच्या भावभावना, गावमातीचे अनोखे गंधसंवेदन यास अतिशय ताकदीनं त्यांनी आपल्या लेखणीत बद्ध करून वाचकांपर्यंत पोहचवलं आहे आणि त्याचं वाचकांनी चांगलं स्वागतही केलं आहे.
‘हायटेक’ काळात पैशाच्या बळावर अतोनात सुविधा आपल्या दिमतीला आल्या आहेत मात्र आपण मोलाचं काही गमावून बसलो आहोत याची जाणीव व्हायला फार वेळ लागतो. तेव्हा हातातून सारं काही निसटून गेलं आहे हे आपल्याला जाणवतं. आपल्यातून आधी आपण गाव गमावून बसलो, संवेदना गमावून बसलो. अशा काळात जे. डी. पराडकर यांच्यातील लेखक तुम्हाला पुन्हा त्या जगात नेऊन तुमच्या अंतर्मनाचा तळ ढवळून काढत तुम्हाला पुन्हा त्या दिवसांपाशी घेऊन जातो. आपण जे जिथे सोडून आलो आहे त्याच्याजवळ साक्षात उभं करतो. कोकणच नाही तर कुठल्याही गावमातीत जगलेल्या माणसाला हे लिखाण आपल्याच भावभावनांचं प्रतिबिंब वाटेल. यातच जे. डी. पराडकर यांचं लेखक म्हणून यश आहे.

800 in stock

पुस्तकाबद्दल

जे. डी. पराडकर यांनी आठवणींचे उत्खनन करून ललितगद्यातून जो ओलावा आजवर समोर ठेवला आहे त्यास ‘वेध अंतर्मनाचा’ हे पुस्तकही अपवाद नाही. मोठमोठी शिखरे पादाक्रांत करणारी माणसे तुम्हास भेटू शकतात मात्र माणसाच्या मनापर्यंत पोहचणे ही म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही. संवेदनशीलता आणि भावनिकता ज्या माणसाकडे असेल त्यास ही गोष्ट अवघड नाहीच. जे. डी. पराडकर हा लेखक पराकोटीचा भावनिक असल्याने कोकणच्या गावमातीची शिदोरी आपल्या समोर घेऊन आला आहे. ‘बेध अंतर्मनाचा’ या पुस्तकाचे वाचक निश्चितच स्वागत करतील यात काही शंका नाही!

– ऐश्वर्य पाटेकर
युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक.

अधिक माहिती

लेखक

जे. डी. पराडकर

पाने

128

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वेध अंतर्मनाचा”

Your email address will not be published. Required fields are marked *