राजर्षी व इतर नाटके

Original price was: ₹ 350.00.Current price is: ₹ 280.00.

एखादी कथा-कादंबरी आणि नाटकाचे पुस्तक यात एक महत्त्वपूर्ण फरक असतो. कोणत्याही दर्जेदार साहित्यप्रकारात ‘वाचनीयता’ हा गुण तर असतोच पण नाटकाच्या संहितेचे पुढे दृक-श्राव्य माध्यमात रूपांतर होणार असते. त्यामुळे ते लिहिणार्‍या नाटककारापुढील आव्हान तुलनेने मोठे असते. आपल्याकडे रंजन करणारी, प्रबोधन करणारी विनोदी-ऐतिहासिक नाटके अनेक आली. काळानुसार त्याचा ढाचा बदलत गेला. रसिक-श्रोत्यांच्या अभिरुचीनुसार नवनवे विषय पुढे आले. ते दमदारपणे सादरही केले गेले. यातूनच नाटकासारखी लोकपरंपरा सशक्त होत गेली. संगमनेर येथील नाटककार डॉ. सोमनाथ मुटकुळे यांची एकाचवेळी दहा नाटके असलेली तीन पुस्तके प्रकाशित होत आहेत. दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचे प्रकाशन होेतेय, ही मराठी साहित्याच्या दृष्टीने निश्चितच दखलपात्र बाब आहे. प्रस्तुतच्या पुस्तकातील ‘असूड’, ‘राजर्षी’, ‘खेळ मांडियेला’ आणि ‘राज्य रयतेचे व्हावे’ ही नाटके आपली इतिहासाची एक सफर तर घडवून आणतीलच पण आपली दृष्टीही व्यापक करतील.

500 in stock

पुस्तकाबद्दल

डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी ऐतिहासिक महापुरुषांविषयी लिहिताना कालसुसंगत भूमिका घेतल्या आहेत. या महापुरुषांचे महत्त्व आजच्या पिढीपुढे विषद करतानाच त्यांचा संघर्ष, त्यांनी सोसलेले, सहन केलेले परिश्रम, समाजाला दिशा देण्यासाठी केलेला त्याग याविषयी प्रभावी मांडणी केली आहे. डॉ. मुटकुळे यांचा वाचनाचा आवाका आणि केवळ मनोरंजनात न अडकता किंवा कुणाचा मुलाहिजा न राखता केलेली सत्यनिष्ठ आणि चिकित्सक मांडणी यामुळे ही पुस्तके महत्त्वपूर्ण ठरली आहेत.

– घनश्याम पाटील