पुस्तकाबद्दल
गेल्या दशक-दोन दशकांत माणसाचं एकूणच जगणं खूपच झपाट्यानं बदलत आहे. या बदलांमुळे सर्वसामान्य माणूस निश्चितच गोंधळून गेलेला आहे. एक माणूस म्हणून व एक पालक म्हणून आपली नेमकी भूमिका काय? मुलांवर संस्कार कसे करावेत? ‘मुलं तर आमचं अजिबात ऐकत नाहीत’ अशी ओरड प्रत्येक घराघरातून दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन-चार वर्षांत तर टीव्हीवरील कार्टून्स आणि मोबाईल्समधील यू-ट्यूब व विविध गेम्स यामुळे प्रश्न गंभीर झालेला आहे. या परिस्थितीत मुलांना संस्कारक्षम काहीतरी दिलं पाहिजे… तेही त्यांच्या भाषेत… त्यांना आवडेल आणि झेपेल अशा पद्धतीनं! काही बालसाहित्यिक व साहित्यिक यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. प्रा. डॉ. राहुल पाटील हे मराठीतील ख्यातनाम समीक्षक आहेत. त्यांनी ‘साहसी लीना’ या बालकथासंग्रहातून मनोरंजन, संस्कार आणि प्रेरणा या तीन गोष्टींचा योग्य समन्वय साधला आहे. परिणामी हा बालकथासंग्रह खूपच प्रभावी झाला आहे. प्रकाशक म्हणून या संग्रहाची आवृत्ती करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. हलक्या-फुलक्या भाषेत छोट्या छोट्या गोष्टींतून संस्कार देण्याचं हे काम ‘साहसी लीना’ हा संग्रह करतो. त्यामुळे, लहान मुलांना आणि पालकांना ही निर्मिती निश्चित आवडेल असा विश्वास वाटतो.
Reviews
There are no reviews yet.