पुस्तकाबद्दल
ही आहे एका राष्ट्रीय स्तरावर सन्मानीत अधिकार्याची प्रेरणात्मक व संघर्षदायी कहाणी… हा संघर्ष इतका अफाट होता की, कोणीही सहज कोलमडून जाईल. मात्र रविंद्र सिद्धेश्वर खंदारे या जिगरबाज माणसाने प्रत्येक प्रतिकूलता अनुकुलतेत बदलली. वडिलांचा हमालीचा गाडा आणि आईच्या डोईवरील वाळूची पाटी आपल्या नशिबात येऊ नये यासाठी त्यांनी अव्याहत मेहनत घेतली. शिक्षणाचा ध्यास घेतला. म्हणूनच प्रसंगी मजूरी करून, कचरा गोळा करून त्यांनी दिवस काढले पण हार मानली नाही. नेटाने शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रमातून आपली जीवनगाथा घडवली.
Reviews
There are no reviews yet.