श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र – पूर्वनोंदणी सुरु

Original price was: ₹ 500.00.Current price is: ₹ 400.00.

रामायणाच्या युद्ध कांडातील वर्णणानुसार राम आणि रावण युद्ध सुमारे 84 ते 87 दिवस चालले. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाला ते सुरू झाले आणि दशमीला रावणवधाने ते संपले. हे युद्ध सर्व देवदेवता स्वर्गातून पाहत होत्या. त्यांच्या हातात फुले होती पण ती कुणावर टाकावीत, हे त्यांना कळत नव्हते. जर रामावर पुष्पवृष्टी केली आणि रावण जिंकला तर? किंवा याउलट झाले तर? शेवटी 84व्या दिवशी त्यांना अंदाज आला की प्रभू श्रीराम निश्चित जिंकणार आणि त्यांनी रामरायावर पुष्पवृष्टी केली. म्हणजे देवांनाही ‘जोे विजेता असेल त्याच्या बाजूने उभे राहणे’ गरजेचे वाटले.
अशा सगळ्या परिस्थितीत जगातील अनेक महायुद्धांचा, घटनांचा, वृत्ती-प्रवृत्तींचा विचार करता समोरच्याला आपण साथ देणे म्हणजे हौतात्म्य पत्करणेच आहे, याची पूर्ण खातरी असूनही त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे हे केवळ आणि केवळ आपल्या मराठमोळ्या मावळ्यांनी दाखवून दिले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना साथ म्हणजे मृत्युला आलिंगन’ हे पुरते ठाऊक असूनही मावळ्यांनी महाराजांसोबत राहणे पसंत केले. यामागे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांच्यात पेरलेला दुर्दम्य आशावाद आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं. स्वराज्याचं स्फूल्लिंग त्यांनी रयतेच्या मनात चेतवलं होतं.
मूठभर मावळ्यांना हाताशी धरून बलाढ्य सत्तेला सळो की पळो करून सोडणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय राजे आहेत. म्हणूनच ते ‘युगपुरुष’ ठरतात. शिवदिग्विजयाची रोमांचकारी आणि अत्यंत प्रेरणादायी कहाणी मांडणारी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके मराठी साहित्यात आहेत. शिवचरित्राचा रोचक, रोमहर्षक, उत्कंठावर्धक आणि अभ्यासपूर्ण धांडोळा घेत मालेगाव येथील शिवव्याख्याते श्री. रमेश शिंदे यांनी हे दालन आणखी समृद्ध केले आहे. छत्रपती शिवरायांचा जीवनपट उलगडून दाखवतानाच त्यांनी सर्व मावळ्यांचीही यथायोग्य दखल घेतली आहे.
इतिहासाच्या अभ्यासकांबरोबरच असंख्य शिवभक्तांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मनात असलेला आदर आणि श्रद्धाभाव द्विगुणित करणारे हे पुस्तक आहे. प्रत्येक शिवप्रेमीने वाचावे, आपल्या संग्रहात ठेवावे आणि अधिकाधिक लोकांना भेट द्यावे असा हा प्रेरणादायी ग्रंथ आहे.

-घनश्याम पाटील

500 in stock

पुस्तकाबद्दल

माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणसं घडवतो, हा इतिहासाच्या अभ्यासकांसाठी पडलेला नेहमीचा प्रश्न आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज या महापुरूषानं एक गौरवशाली इतिहास घडवला आणि या इतिहासाकडे बघताना नवा इतिहास घडला. हा वेगळा इतिहास महाराष्ट्राच्या मातीत घडला. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अपार आदर असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडं बघितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कथा ऐकत इथली पिढी लहानाची मोठी होते. अशा परिस्थितीत शिवचरित्राबद्दल असणार्‍या कमालीच्या आदरापोटी निवृत्त शिक्षक आणि मालेगावातील शिवव्याख्याते श्री. रमेश शिंदे यांनी शिवचरित्र लिहिण्याचा हा प्रपंच केला आहे. सन-सनावळ्या, घटना व प्रसंग यांच्या जंजाळात वाचकांना अडकवून न ठेवता नेमका इतिहास सुलभ पद्धतीने सांगण्याचे शिवधनुष्य रमेश शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने पेललेले आहे. श्री. रमेश शिंदे यांनी यापैकी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. शिवचरित्राची मांडणी करत असताना अनेक छोट्या गोष्टी व विषयांना त्यांनी हात घातला आहे. सोप्या भाषेत शिवचरित्र सांगता येते, वस्तुनिष्ठ पद्धतीने ते मांडता येते व रंजक पद्धतीने ते सादर करता येते याचा वस्तुपाठ रमेश शिंदे यांनी या निमित्ताने घालून दिलेला आहे. याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!

-उमेश सणस

शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक

अधिक माहिती

लेखक

नरहरी विश्वनाथ पत्तेवार

पाने

208

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र – पूर्वनोंदणी सुरु”

Your email address will not be published. Required fields are marked *