पुस्तकाबद्दल
माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणसं घडवतो, हा इतिहासाच्या अभ्यासकांसाठी पडलेला नेहमीचा प्रश्न आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज या महापुरूषानं एक गौरवशाली इतिहास घडवला आणि या इतिहासाकडे बघताना नवा इतिहास घडला. हा वेगळा इतिहास महाराष्ट्राच्या मातीत घडला. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अपार आदर असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडं बघितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कथा ऐकत इथली पिढी लहानाची मोठी होते. अशा परिस्थितीत शिवचरित्राबद्दल असणार्या कमालीच्या आदरापोटी निवृत्त शिक्षक आणि मालेगावातील शिवव्याख्याते श्री. रमेश शिंदे यांनी शिवचरित्र लिहिण्याचा हा प्रपंच केला आहे. सन-सनावळ्या, घटना व प्रसंग यांच्या जंजाळात वाचकांना अडकवून न ठेवता नेमका इतिहास सुलभ पद्धतीने सांगण्याचे शिवधनुष्य रमेश शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने पेललेले आहे. श्री. रमेश शिंदे यांनी यापैकी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. शिवचरित्राची मांडणी करत असताना अनेक छोट्या गोष्टी व विषयांना त्यांनी हात घातला आहे. सोप्या भाषेत शिवचरित्र सांगता येते, वस्तुनिष्ठ पद्धतीने ते मांडता येते व रंजक पद्धतीने ते सादर करता येते याचा वस्तुपाठ रमेश शिंदे यांनी या निमित्ताने घालून दिलेला आहे. याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
-उमेश सणस
शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक
Reviews
There are no reviews yet.