पुस्तकाबद्दल
संविधानाने दिला हक्क तमाम जनतेला
नकोच दुजाभाव कोणा मानव जातीला
‘उमेद’च्या साथीने प्रकटलेल्या अशा अनेक चारोळ्यातून संविधानातील मूल्यविचार तसेच समतेचा पुरस्कार करणाऱ्या इस्लाम धर्माच्या संस्कारातून कवयित्रीवर झालेला काव्यसंस्कार या संग्रहातून प्रत्ययास येतो. श्रमनिष्ठा, नीतीमूल्य, बंधुभाव भारतीय समाजात खोलवर रुजत जावेत याचेही संस्कार चारोळीसंग्रहातून करता येतात हे कवयित्री मलेका शेख-सैय्यद यांनी सिद्ध केले आहे. या संग्रहाची साधी, सरळ शैली रचनेला सूत्रमयता व अर्थसघनता देते. वाचकांच्या मनाला भिडणारी निवेदक भाषा, सामाजिक विषय, मनःस्थितीचे उत्कृष्ट चित्रण या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. प्रतिभेची नवनिर्मिती अशीच उत्तरोत्तर वाढत जाओ यासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा !
शेख शफी बोल्डेकर
संस्थापक,
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था
Reviews
There are no reviews yet.