शोधक

 130.00  104.00

गणेश आटकळे यांच्या या काव्यात आहे एक मोकळाढाकळा, आपल्या गावावर, माणसावर, मातीवर प्रेम करणारा रांगडा आविष्कार! हा आविष्कार सरळसोट आहे. थेट आहे. त्यात उगाचची आडवळणे नाहीत. या कवितात विद्रोह आहे पण तो मराठमोळ्या संस्कृतीतून निनादनार्‍या डफावरच्या थापेसारखा रांगडा पण चित्तवृत्ती खळबळवून सोडणारा सर्जनात्मक विद्रोह आहे. या विद्रोहाला मानवी जीवनाच्या कारुण्याची किनार आहे. वारकर्‍यांच्या स्नेहल श्रद्धाभावाचे अवगुंठण घेतलेला हा विद्रोह सच्चा विद्रोह आहे. तो थेट अंत:करणातून आलेला आहे. त्यावर कोणाच्या अनुकरणाची छाप नाही.

494 in stock

पुस्तकाबद्दल

हा कवी मागास भागातून येत आयटी क्षेत्रात पाय रोवतो, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियन इंटिलिजन्ससारख्या अत्याधुनिक ज्ञानक्षेत्रात पाऊल रोवतो आणि तरीही आधुनिक संस्कृतीचा नाटकी भाग न बनता आपला अस्सल मराठमोळा भावनाकंद जपत आपल्याच भाषेत आणि शैलीत कवितांतून व्यक्त होतो ही महत्त्वाची बाब आहे. अनेक कवी अनुकरणाच्या आहारी जात अस्सलपणा हरपून बसतात. ते आटकळेंनी केले नाही. भविष्यातही ते लिहित राहतील. लिहावे. आपली शैली स्वतंत्र रूप न सोडता पुढे विकसित करत नेत आज हरपत चाललेल्या ग्रामीण साधेपणाचे विलोभनीय दर्शन काव्यातून, कथांतून घडवत रहावे ही अपेक्षा आणि शुभेच्छा!
-संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक

अधिक माहिती

कवी

गणेश आटकळे

पाने

96

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोधक”

Your email address will not be published. Required fields are marked *