विचारांच्या धुंदीत Vicharanchya Dhundit

Original price was: ₹ 100.00.Current price is: ₹ 80.00.

जीवनाचे पैलू उलगडणारी कविता

Out of stock

पुस्तकाबद्दल

प्रज्ञाताई करंदीकर यांचा हा पहिलाच संग्रह. त्या मुळच्या पुणेकर असून सध्या व्यवसायाच्या निमित्ताने बंगळूरू येथे स्थायिक झाल्या आहेत. आपल्या आसपास घडणार्‍या घटनांचा सूक्ष्मपणे वेध घेऊन या घटनांना अतिशय सुंदर शब्दात त्यांनी काव्यबद्ध केले आहे. मनातील भावभावनांच्या विविध छटा त्यांनी कवितेच्या माध्यमातून मांडल्यात. कोणत्याही चौकटीत न जखडता त्यांनी मुक्तपणे कवितेच्या माध्यमातून भावनांना संचार करू दिला. या कवितांमध्ये आयुष्यातील हेलकावे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मांडलेत. उत्कट प्रेमाचे विविध रंग कवितेच्या माध्यमातून बरसताना दिसतात. जीवनाकडे सकारात्मकदृष्ट्या बघण्याचा चांगला संदेश त्यांची कविता देते.