थांब ना रे ढगोबा

 150.00  120.00

कविता किंवा कथालेखन करणं हे जोखमीचं काम आहेच. त्यातल्या त्यात बालमनाला भुरळ पाडणारे लेखन करणं हे खरोखरच मोठं कसब आहे. लेखकाला त्याचे वय विसरून, लहान होऊन परकायाप्रवेशानेच हे साध्य करता येते. लहान मुलांच्या मनाला साद घालणारं लेखन करताना अनेकांना कसरत करावी लागते; पण कवी राजेंद्र उगले यांच्या ‘थांब ना रे ढगोबा…’ या बाल काव्यसंग्रहातील कविता ही खरोखरच बालमनाला ताल धरायला लावणारी कविता आहे.

992 in stock

पुस्तकाबद्दल

या संग्रहात असणाऱ्या सर्वच कविता या अतिशय साध्या-सोप्या शब्दात मुलांशी हितगुज करतात. त्यातले विषय मुलांच्या आवडीचे आहेत. त्यामुळे मुलांना या कवितांचा नक्कीच लळा लागेल; यावर माझा विश्वास आहे. मुलांनी माकड पाहिले आहे, रस्त्याचे काम होताना पाहिले आहे, किचन आणि किचनमधल्या गोष्टीही त्यांनी रोज पाहिल्या आहेत. फळं, फुलं, भाज्या, नदी, डोंगर पाहिले आहेत. पाऊस पाहिला आहे, डॉक्टरही पाहिलेले आहेत. या रोजच्या अनुभवातील, परिघातील गोष्टींना राजेंद्र उगले यांनी मोठ्या खुबीने या बालकवितांमध्ये स्थान दिले आहे. पाणीपुरी, मिसळ हे तर मुलांचे अतिशय आवडीचे विषय. त्याचीही कविता ‘थांब ना रे ढगोबा…’मध्ये मुलांना वाचावयास मिळते.

अधिक माहिती

कवी

राजेंद्र उगले

पाने

४८

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “थांब ना रे ढगोबा”

Your email address will not be published. Required fields are marked *