शहीद

 110.00  88.00

संजय चौगुले हे गडहिंग्लज येथील एक हरहुन्नरी युवक. पेट्रोल पंपावर काम करण्यापासून अनेक काबाडकष्ट करणार्‍या जिद्दी संजय यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा मनोनिश्चय केला आणि त्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यातून त्यांचे ईप्सित साध्य झाले आणि ते पोलीस खात्यात रूजू झाले. प्रतिकूलतेला अनुकूलतेत बदलण्याचे सामर्थ्य अंगी बाळगून असलेल्या संजय यांनी धडपडणार्‍या तरूणाईपुढे आदर्शांचा मनोरा उभारला. आपल्या ध्येयासाठी समाजकंटकांशी चार हात करताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या हौतात्याची ही गाथा गडहिंग्लजचे ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष धुमे यांनी अतिशय नेमकेपणाने मांडली आहे.

500 in stock

पुस्तकाबद्दल

संजय यांच्या आई, पत्नी, अन्य आप्तेष्ट यांच्या भावनाही शब्दबद्ध करताना धुमे सरांनी त्यांच्या लेखणीचा आविष्कार घडवित संजय यांचा जीवनपट डोळ्यासमोर उभा केला आहे. ज्यांना देशाविषयी चाड आहे, सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे, आपल्या आजूबाजूचे खरे ‘नायक’ ज्यांना समजून घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरणारे आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी तर संजय चौगुले यांची जीवनयात्रा अवश्य समजून घ्यायला हवी.

अधिक माहिती

लेखक

सुभाष धुमे

पाने

64

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शहीद”

Your email address will not be published. Required fields are marked *