बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा

 250.00  200.00

भारतीय इतिहासातील ‘सहा सोनेरी पाने’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मांडली होती. जेव्हा जेव्हा आपलं राष्ट्र आक्रमकांच्या टाचेखाली पिचलं, चिरडलं गेलं तेव्हा तेव्हा शौर्य आणि पराक्रमाची परंपरा तेवत ठेवणाऱ्या आपल्या वीर पुरूषांनी जे अचाट साहस दाखवलं त्यांची सावरकरांनी ‘सोनेरी पाने’ म्हणून यथायोग्य दखल घेतली. कोकणातील निसर्गप्रेमी पत्रकार श्री. जे. डी. पराडकर यांनी त्यांच्या आजूबाजूला होऊन गेलेल्या काही व्यक्तिरेखा निवडून त्यांचं प्रभावी शब्दचित्रण केलं आहे. इथला सामान्य माणूस हा राष्ट्राचा कणा मानला तर जेडींनी निवडलेल्या या व्यक्तिरेखा दखलपात्र आहेत. कोकणातील सामान्य माणूस अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यावर मात करत जगतो कसा, वागतो कसा हे अनुभवायचं असेल तर हे पुस्तक वाचावंच लागेल. ही ‘सोनेरी पानं’ जेडींच्या लालित्यपूर्ण शैलीनं ओथंबलेली आहेत. त्याच्या जोडीलाच ‘डोंगरावरच्या कथा’ ही दिल्यानं या व्यक्तिचित्रणांची मूळं मातीला घट्टपणे बिलगलेली आहेत. अठरा पुराणं आणि सहा शास्त्रं या पुस्तकातील चोवीस नायकांना ज्ञात असतील नसतीलही! मात्र वेदांचा अभ्यास करताना सामान्यांच्या वेदना समजून घ्यायच्या असतील तर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ‘ही व्यक्तिचित्रं वाचताना आम्हाला पानापानांवर पुलं आठवले’ असं कोणी म्हटलं तर ती मुळीच अतिशयोक्ती ठरू नये, अशी सशक्त मांडणी जे. डी. पराडकर यांनी केली आहे.

– घनश्याम पाटील

500 in stock

पुस्तकाबद्दल

जगात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या, आताही आहेत पण त्यांचा सहवास आपल्याला लाभेलच असे नाही. आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना आणि सहवासात येणाऱ्या व्यक्ती कळत-नकळत आपल्यावर संस्कार करत असतात. आपले जीवनमूल्य वाढवणाऱ्या, जीवनमान सुधारणाऱ्या व्यक्ती आपल्या नेहमी लक्षात राहतात. तसे पाहता प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळते. ज्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा, कार्याचा, स्वभावाचा आदर्श घ्यावा अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूलाच असतात आणि अशाच व्यक्तिंच्या सहवासातून, निरीक्षणातून लेखक जे.डी. पराडकर घडले. या व्यक्तिरेखा आता त्यांच्या लेखणीत उतरून ‘बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा’ या पुस्तकाद्वारे आपल्याला भेटायला, आपलं मनोरंजन करायला, आपल्यातला ‘माणूस’ जागवायला आणि प्रेरित करायला आल्या आहेत

अधिक माहिती

लेखक

जे. डी. पराडकर

पाने

136

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा”

Your email address will not be published. Required fields are marked *