कसबा डायरी

 250.00  200.00

आपले बालपणातले जगणे ज्या भवतालने समृद्ध केले, त्याची नेमकी आणि तपशीलाने जाणीव ठेवून त्या भूमीचे, त्या निसर्गाचे, त्या बास्तूचे आणि भवतालच्या पर्यावरणाचेही ऋण फेडण्याचा अनोखा प्रयत्न जे. डी. पराडकर यांनी केला आहे. नावावरूनच हा परिसर अर्थात कसबा आहे, हे लक्षात येते. कसथ्याला ऐतिहासिक, भौगोलिक काही प्रमाणात धार्मिक आणि सांस्कृतिक स्थानही आहे. या परंपरेचा काही बाटा लेखकाच्या जगण्याचा भाग झाला कारण लेखकाचे बालपण तेथे गेले. ‘ कसबा डायरी’ या नावाने गफलत होण्याचे कारण नाही. या रुक्ष नोंदी नाहीत. तेथील इतिहास, भूगोल, संस्कृती या साऱ्याचा परिणाम झालेली माणसे आणि तेथील जगणे याचा अत्यंत आपुलकीने धांडोळा लेखकाने घेतला आहे.

500 in stock

पुस्तकाबद्दल

‘बालपणीचे दिवस सुखाचे’ हे सार्वत्रिक असते मात्र बालपणीच्या साऱ्याच आठवणी रम्य असतात असे नव्हे. लेखकाचे बालपण कसब्यातील निसर्गाच्या कुशीत गेल्याने तेथील निसर्ग अत्यंत जिवंतपणे चित्र दर्शी शैलीने उतरला आहे. बालपण पुन्हा जगताना जे. डी. जणू स्वतःशीच गप्पा मारतात. मग एका पाठोपाठ एक आठवणींची लड़ी उलगडत जाते. बालपणी केलेल्या खोड्या, खालेला मार, किंचित केलेले प्रमाद, उत्सवाचा घेतलेला अनुभव, कसब्यातील देवळामधील किरणोत्सर्गासारखा रोमांचित करणारा अनुभव यांचा आजही त्याच्यावर प्रभाव कायम आहे. याच्या जोडीने बालपणीची चण्याची पुडी, पडद्यावरचा चित्रपट, शाळेची बाट, आट्यापाट्यासारखे खेळ, कधीतरी चुकून घेतलेला झुरका, सिगरेटच्या पाकिटांची गंमत, कबटाच्या गोळ्या यासह बालविश्वातील सायकल, आंबा अशा हरेक गोष्टीत लेखक आणि वाचकही हरवून जातो. ज्यांना या आठवणीत डुंबायला आवडते, त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. ज्यांना या आठवणी माहीत नाहीत वा ज्यांच्याकडे अशा समांतर आठवणी नाहीत, तेही हे लिखाण आवडीने बाचतील, हे लिखाण फक्त चार घटका रिझवणारे नाही, काही वेळा डोळ्यात पाणी काढणारेही आहे.

– शिरीष दामले

अधिक माहिती

लेखक

जे. डी. पराडकर

पाने

136

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कसबा डायरी”

Your email address will not be published. Required fields are marked *