हळवा कोपरा

Original price was: ₹ 250.00.Current price is: ₹ 200.00.

संगमेश्वर तालुक्यातील लोवलेस्थित वाचकप्रिय लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘चपराक प्रकाशन’कडून प्रसिद्ध होत असलेले हे सातवे पुस्तक. जेडींच्या लेखणीतून कोकणचा समृद्ध, अस्पर्श असा निसर्ग जसा दिसतो तशीच वरपांगी साधी भोळी पण अंतरी नाना कळा असणारी माणसेही दिसतात. कोकणातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांची स्पंदनेही लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवतात. ‘हळवा कोपरा’ हे पुस्तकही याला अपवाद नाही. मुळात हे साप्ताहिक स्तंभलेखन असल्याने इथे विषयांची विविधता पुरेपूर आहे. ‘पैजेचा विडा’ हा पहिलाच लेख आपल्याला भूतकाळात घेऊन जातो. पैज लावून अविश्वसनीय वाटावा असा आहार घेणारे नमुने इथे आपल्याला भेटतात. पंचवीस लाडू साजूक तुपात कालवून खाणारे अनंतराव, दोनशे गरे असणारा फणस एकट्याने फस्त करणारा सीताराम, दही आणि मिरचीच्या जोडीने तब्बल साठ वडे चेपणारे लक्ष्मणराव, उकडीचे एकवीस मोदक स्वाहा करणारे प्रभू असे अनेक अवलिये या लेखात आपल्याला भेटतात. अर्थात तो काळच वेगळा होता. त्या कष्टकरी मंडळींमध्ये हे सारे पचवण्याचे सामर्थ्य होते. आज कोणी असा अचाट उद्योग केलाच तर त्या ताटावरून इस्पितळातील खाटेवरच रवानगी होणार की!
‘लक्ष्मीची गोकर्ण’ ही कथा तर वेगळाच विषय हाताळणारी. मंदाकिनी या फुलवेडीची ही कथा. आपल्या बागेत असंख्य प्रकारची फुलझाडे, त्यात निळ्या – जांभळ्या गोकर्णफुलांची रेलचेल असताना पांढरी गोकर्ण नाही म्हणून खंतावणार्‍या मंदाकिनीला अखेर बर्‍याच प्रतीक्षेनंतर पांढर्‍या गोकर्णीची शेंग मिळते खरी पण खूप प्रतीक्षेनंतर उगवून आलेल्या वेलीला फूल लागायचे काही चिन्ह नव्हते. शेवटी निराश होऊन ती वेल उपटण्यासाठी हात सरसावतो पण…

799 in stock

पुस्तकाबद्दल

या संग्रहात एकूण वीस लेख आहेत. विस्तारभयास्तव सर्वच लेखांचा परामर्श घेता येत नाही. संपूर्ण पुस्तक निःसंशय वाचनीय आहे. येणार्‍या प्रत्येक पुस्तकाबरोबर जेडींच्या लेखणीचे सामर्थ्य वृद्धिंगत होतंय. साधीसोपी तरीही लालित्यपूर्ण शब्दरचना, भवतालचा निसर्ग आणि माणसे वाचण्याची त्यांची अद्भूत क्षमता त्यांनी आधीच्या ग्रंथातून सिद्ध केली आहेच. हे पुस्तकही याला अपवाद नाही. वाचक या पुस्तकाला भरघोस प्रतिसाद देतील याची खातरी आहे. जेडींच्या लेखणीतून असेच सकस शब्दभांडार पाझरत राहो यासाठी मनापासून शुभेच्छा!

– अरुण कमळापूरकर, पुणे

अधिक माहिती

लेखक

जे. डी. पराडकर

पाने

136

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हळवा कोपरा”

Your email address will not be published. Required fields are marked *