अक्षरयात्रा

 400.00  200.00

जे. डी. पराडकर यांचे ‘अक्षरयात्रा’ हे ‘चपराक’ तर्फे प्रकाशित होणारे पाचवे पुस्तक आहे. कोकण म्हणजे सुंदर निसर्ग, अंतर्मनाला साद घालणारी बोली भाषा, येथील चालीरीती-परंपरा हे सारंच अद्भूत आहे. पराडकर यांनी आपल्या ३२ वर्षाच्या लेखन प्रवासात कोकणची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांच्या लेखणीतून कोकण केवळ वाचायला मिळते असे नव्हे तर ते डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद पराडकर यांच्या लेखणीत आहे. छोटे-छोटे विषय हलक्या फुलक्या शब्दात वाचकांसमोर उलगडताना वाचकही या विषयात समरस होऊन जातो.

कोरोनाचा सामना करताना लॉकडाऊनचा कालावधी म्हणजे प्रत्येकाला काळजी वाटणारा, भीतीदायक आणि कंटाळवाणा ठरत होता. अशावेळी घरी असणाऱ्या प्रत्येकाला आपल्या लेखणीतून तणावमुक्त करण्यासाठी पराडकर यांनी २७ मार्च २०२० ते ५ जुलै २०२० या कालावधीत सलग शंभर दिवस १०० लेख लिहून वाचकांसाठी आपली लेखनसेवा रूजू केली. हे लेख वाचकांना नवचैतन्य देणारे ठरले. एका शब्दावरून विस्तृत लेख लिहिण्याची जे. डी. यांची खासियत आहे. लॉकडाऊनमध्ये लिहिलेल्या १०० लेखात त्यांचे सारे लेखनकौशल्य अनुभवायला मिळाले. आपले लेखन आपल्यासह वाचकांनाही आनंद देत राहावे हा त्यांचा उद्देश नक्कीच अभिनंदनीय आहे. ‘अक्षरयात्रा’ या पुस्तकात त्यांनी निवडक लेखांचा समावेश केला आहे.

– एस. एम. देशमुख

मुख्य विश्वस्त, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद

600 in stock

पुस्तकाबद्दल

जत्रा-यात्रा हे शब्द वापरताना साधारणतः सांगितलं जातं की, ज्यात ‘जातं’ ती जत्रा आणि ‘येतं’ ती यात्रा! ही तर जे. डी. पराडकरांसारख्या अनुभवसंपन्न पत्रकाराने, लेखकाने आणलेली ‘अक्षरयात्रा’ आहे. शंभर दिवस सातत्यानं रोज एक लेख लिहिणं आणि लोकांचं प्रबोधन, रंजन करणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी नैतिक अधिष्ठानासह संबंधित विषयाचा अभ्यास लागतो. म्हणूनच या पुस्तकातील एकाहून एक सरस लेखासोबत वाचक म्हणून आपलीही अक्षरयात्रा घडते. यात्रा म्हटलं की लोकानी एकत्र येणं आणि नंतर प्रवास करणं अपेक्षित असतं. या पुस्तकातील लेखांसोबत आपला वाचनप्रवास आनंददायी होतो.

यातील लेख ‘अ-क्षर’ आहेत. काळाच्या ओघात बोलणे नष्ट होते; पण जे लिहून ठेवलेले असते ते घटत नाही, नष्ट होत नाही! त्यात पराडकरांसारख्या लेखकाच्या लालित्यपूर्ण शब्दांचा स्पर्श झाल्यावर तर ती ‘अक्षरयात्रा’ आणखी संपन्न आणि समृद्ध होते. म्हणूनच हे पुस्तक पूर्ण होत असतानाचा माझा आनंद अवर्णनीय आहे. ही अक्षरयात्रा डोईवर घेऊन लवकरच वाजत-गाजत आपल्याकडे येत आहे. त्याचे नेहमीप्रमाणे जल्लोषात स्वागत होईल, याची मला पूर्ण खातरी आहे.

– घनश्याम पाटील
प्रकाशक, चपराक

अधिक माहिती

लेखक

जे. डी. पराडकर

पाने

256

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अक्षरयात्रा”

Your email address will not be published. Required fields are marked *