पुस्तकाबद्दल
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी चालवेली भिंत किंवा जगद्गुरू तुकोबारायांचे वैकुंठगमन असे विषय महाराष्ट्रात अनेकदा चर्चिले जातात. मात्र कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करण्याची अद्भूत क्षमता असलेल्या मराठी माणसावर अशा गोष्टींचा परिणाम होत नाही. त्यांच्या श्रद्धा अटळ आहेत. कोणत्याही तात्त्विक मुद्याला विवेकशास्त्रानेच अचूक नेम साधायला हवा या उद्देशाने तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून या विषयाचे विवेचन आणि विश्लेषण व्हायला हवे. त्यामुळे आपल्या संतांनी जे चमत्कार घडविले तिकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता त्यामागचे विज्ञान शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे श्री. दत्तात्रेय गायकवाड यांनी केला आहे.
Reviews
There are no reviews yet.