पुस्तकाबद्दल
महाराष्ट्रातील बहुजन समाजाला लाभलेला एक उत्तुंग नायक म्हणजे पवार साहेब. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या बहुजन नायकांच्या विचारांवर पवार साहेबांचा वैचारिक पिंड पुष्ट झाला आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतीय राजकारणात शेतकरी आणि बहुजनांचा कळवळा असलेला ‘रयतेचा राजा’ म्हणून पवार साहेबांची प्रतिमा आहे. सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची वृत्ती, समस्येच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी लागणारी अभ्यासू वृत्ती, व्यासंग, स्वतःचा स्वतंत्र विचार, निर्णयक्षमता आणि मुख्य म्हणजे विचारांना कृतीत आणण्यासाठी लागणारी कृतीप्रवणता, धडाडी हे सर्व पवार साहेबांच्या प्रकृतीत असल्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर त्यांचा फार मोठा प्रभाव आहे. अशा या महानेत्यांवर संदीप राक्षे यांनी काव्यस्पर्धा घेतली आणि ढगफुटी व्हावी त्याप्रमाणे कविता आल्या. अशाच काही निवडक कवितांचे हे संपादित पुस्तक. शरद पवार यांचे हे एकप्रकारचे काव्यमय चरित्रच आहे असे म्हणायला हरकत नाही.
Reviews
There are no reviews yet.