पुस्तकाबद्दल
मराठीमध्ये रसरसीत आणि प्रत्ययकारी व्यक्तीचित्रणांची परंपरा फार मोठी आहे आणि तितकीच श्रीमंत आहे. माटे, घाटे, अत्रे, खांडेकर, पाध्ये, माडगूळकर, सावंत यांच्यासारख्या पासून ते शरदचंद्र पवारापर्यंत ती विकसित झाली आहे नि श्रीमंतही झाली आहे. या श्रीमंत परंपरेमध्ये आता पत्रकार सुधाकर कवडे यांचाही समावेश करायला हवा. मातीवर खेळणारी, मातीवर लोळणारी, मातीवर पोसलेली आणि गाव शिवाराशी नाते सांगणारी ही ग्रामीण माणसं म्हणजे मानवी स्वभावाचे बहुरंगी दर्शन होय. या सार्या व्यक्तीचे एकाच शब्दात वर्णन करावयाचे झाले तर ‘प्रेम’ एवढा एकच शब्द पुरेसा आहे.
ग्रामीण जीवनातील ही गाळीव रत्ने साकार करताना श्री. सुधाकर कवडे यांच्या लेखणीला हिरव्या पालवीचा रंग आहे. ओल्या मातीचा गंध आहे. फुलत्या फुलाचा सुगंध आहे नि खळखळणार्या पाण्याचा नाद आहे. त्यामुळे खास ग्रामीण बोलीतील ही माणसे आपल्या काळजात केव्हा ठाण मांडतात, हे समजतच नाही.
Reviews
There are no reviews yet.