पुस्तकाबद्दल
हे पुस्तक शहरी आणि ग्रामीण असा भेद निर्माण न करता गापल्या गावाचा, आपल्या मातीचा, आपल्या संस्कृतीचा वेध घेतं. आजचं गांव कसं बदलत चाललंय हे सांगतानाच गावाचं सामर्थ्य अधोरेखित करतं. ‘जे न करी राव, ते करी गाव’ असं म्हटलं जातं ते उगीच नाही. सुनील जवंजाळ या प्रतिभासंपन्न आणि संवेदनशील लेखकानं गावाचा घेतलेला हा शोध थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्याशी नातं सांगणारा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि भौतिक प्रगतीची वाट चोखाळताना आपल्या मुळांचा विसर पडू नये या प्रांजळ भूमिकेतून हे पुस्तक सिद्धीस गेलं आहे. अनेकांना हे पुस्तक आपल्या बालपणात घेऊन जाईल, अंतर्मुख करेल आणि अंतःकरणातल्या व्यापक कळवळ्यातून गावाच्या ओढीचा गोडवा वाढविण्यास मदत करेल असं वाटतं.
Reviews
There are no reviews yet.