पुस्तकाबद्दल
घनश्याम पाटील यांनी दैनिक ‘आपलं महानगर’मध्ये लिहिलेल्या पुस्तक परीक्षणांचा संग्रह.
₹ 100.00 ₹ 80.00
‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांचा हा समीक्षाग्रंथ. या पुस्तकात त्यांनी त्यांना भावलेल्या साहित्यकृतींचा समावेश केला आहे. लेखकांनी जेवढ्या आत्मियतेने पुस्तकांचे लेखन केले आहे तेवढ्याच ममत्त्वाने किंबहुना त्याहून अधिक पोटतिडिकेने पाटील यांनी या साहित्यकृतींची उचित दखल घेतली आहे.
एखाद्या मित्राने गाजलेल्या चित्रपटाच्या कथानकावर मोजून पाचच मिनिटांचे सफाईदारपणे भाष्य करावे आणि त्यानंतर एकतर तो चित्रपट पाहण्याची मनात इच्छा जागावी नाहीतर ते भाष्य ऐकूनच तृप्ततेचा ढेकर द्यावा अशा रितीनेच पाटील यांनीसुद्धा या ग्रंथातील साहित्यकृतींचा ओघवत्या शैलीत, आपुलकीने, नेटकेपणाने परामर्श घेतला आहे. मात्र हे करीत असताना या ग्रंथात समाविष्ट प्रत्येक पुस्तकातील सौंदर्यस्थळे त्यांनी जाणीवपूर्वक अचूकपणे अधोरेखित केली आहेत.
8 in stock
घनश्याम पाटील यांनी दैनिक ‘आपलं महानगर’मध्ये लिहिलेल्या पुस्तक परीक्षणांचा संग्रह.
लेखक | घनश्याम पाटील |
---|---|
पाने | ११२ |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.