पुस्तकाबद्दल
जत्रा-यात्रा हे शब्द वापरताना साधारणतः सांगितलं जातं की, ज्यात ‘जातं’ ती जत्रा आणि ‘येतं’ ती यात्रा! ही तर जे. डी. पराडकरांसारख्या अनुभवसंपन्न पत्रकाराने, लेखकाने आणलेली ‘अक्षरयात्रा’ आहे. शंभर दिवस सातत्यानं रोज एक लेख लिहिणं आणि लोकांचं प्रबोधन, रंजन करणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी नैतिक अधिष्ठानासह संबंधित विषयाचा अभ्यास लागतो. म्हणूनच या पुस्तकातील एकाहून एक सरस लेखासोबत वाचक म्हणून आपलीही अक्षरयात्रा घडते. यात्रा म्हटलं की लोकानी एकत्र येणं आणि नंतर प्रवास करणं अपेक्षित असतं. या पुस्तकातील लेखांसोबत आपला वाचनप्रवास आनंददायी होतो.
यातील लेख ‘अ-क्षर’ आहेत. काळाच्या ओघात बोलणे नष्ट होते; पण जे लिहून ठेवलेले असते ते घटत नाही, नष्ट होत नाही! त्यात पराडकरांसारख्या लेखकाच्या लालित्यपूर्ण शब्दांचा स्पर्श झाल्यावर तर ती ‘अक्षरयात्रा’ आणखी संपन्न आणि समृद्ध होते. म्हणूनच हे पुस्तक पूर्ण होत असतानाचा माझा आनंद अवर्णनीय आहे. ही अक्षरयात्रा डोईवर घेऊन लवकरच वाजत-गाजत आपल्याकडे येत आहे. त्याचे नेहमीप्रमाणे जल्लोषात स्वागत होईल, याची मला पूर्ण खातरी आहे.
– घनश्याम पाटील
प्रकाशक, चपराक
Reviews
There are no reviews yet.