अस्तित्व Astittva

Original price was: ₹ 80.00.Current price is: ₹ 64.00.

अस्तित्व शोधणारी कविता

149 in stock

पुस्तकाबद्दल

गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात निष्ठेने अध्यापन कार्य करणारे शांताराम डफळ हे संवेदनशील मनाचे कवी आणि विद्येचे ‘उपासक’ आहेत. शैक्षणिक क्षेत्राद्वारे विद्यार्थ्यांची मनं घडविण्याबरोबरच कवितेच्या माध्यमातून शब्दपेरणी करण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. त्यांच्या कवितेतील प्रतिभा, प्रतिमा आणि रूपकं पाहता त्यांना प्रतिभेचं वरदान लाभलंय याची साक्ष पटते. या अस्सल मराठमोळ्या कवीनं कवितांचे सर्व प्रकार सहजगत्या पण तितक्याच क्षमतेनं हाताळलेत. छंदबद्ध आणि मुक्तछंदातील त्यांच्या कविता रसिकांच्या मनाचा ठाव घेतात.