अवीट गाणी

Original price was: ₹ 200.00.Current price is: ₹ 160.00.

ज्येष्ठ पत्रकार, व्यासंगी कवी आणि एक सुहृदयी व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीराम ग. पचिंद्रे यांनी हा ठेवा उपलब्ध करून दिलाय. विविध गाण्यांचं रसग्रहण करताना त्यांनी अतिशय नेमकेपणानं त्याचं जे वर्णन केलंय ते केवळ अद्वितीय आहे. या गाण्यांविषयी वाचताना आपण ती कधी गुणगुणु लागतो हे आपल्याही लक्षात येत नाही. शिवाय श्रीराम पचिंद्रे यांचं शब्दवैभव आणि या श्रीमंतीतून त्यांची शब्दांवरील हुकूमी पकड यामुळं हे लेख वाचताना आपण रोजच्या ताणतणावापासून कोसो मैल दूर जातो. मराठीबरोबरच हिंदी-उर्दू शब्दांवरील त्यांची हुकूमत वाखाणण्याजोगी आहे. ‘अवीट गाणी’ हे पुस्तक आपल्याला समृद्ध करेल आणि गायकीच्या विश्वाची आनंददायी सफर घडवून आणेल हे नक्की!

500 in stock

पुस्तकाबद्दल

श्वासोच्छोश्वास ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपण ठरवून करत नाही. गाण्याचंही तसंच आहे. एखादं चांगलं गाणं आपल्या कानावर पडलं की आपण ते गुणगुणत राहतो. आपण कितीही चिंतेत असलो, तणावात असलो तरी एखाद्या चांगल्या गाण्यामुळं आपल्याला हलकफुलकं वाटू लागतं. अत्यंत प्रतिकूल मनःस्थितीतही एखादं दर्जेदार गाणं आपल्याला नवी उभारी देऊ शकतं. रोजच्या जीवनात अनेकांनी हा अनुभव घेतलेला असेलच. अशाच काही गाजलेल्या गाण्यांचा आस्वादक आढावा म्हणजे हे पुस्तक.