पुस्तकाबद्दल
इतिहासातील प्रसिद्ध महापुरुषांच्या आयुष्यातील घटनांचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. खरेतर यातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. त्यांच्या आयुष्याचा, कर्तृत्वाचा सार नेमकेपणाने काढण्याचे काम अंजनीकर यांनी प्रभावीपणे केले आहे. त्यामुुळेच हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, आपल्या संग्रही ठेवावे असे झाले आहे. सध्याची आजूबाजूची भीतीदायक परिस्थिती पाहता या पुस्तकातील लेख दिशादर्शक आहेत. ‘महापुरुषांच्या चरित्र कार्याचे स्मरण करताना वाचकांमध्ये जीवन जगण्याची उभारी निर्माण व्हावी, ती गतिमान व्हावी’ अशी रास्त अपेक्षा लेखक अंजनीकर यांनी व्यक्त केली. बाल-कुमारांनी, त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी वाचावी, कोणत्याही निमित्ताने इतरांना भेट द्यावी अशी ही आदर्श ‘चरित्र स्मरण’ गाथा!
-घनश्याम पाटील
Reviews
There are no reviews yet.