hech-khare-jagjjete

 150.00  120.00

पूर्वीच्या काळी जग जिंकण्यासाठी घनघोर युद्ध करावं लागायचं. आजच्या काळात तुम्हाला तुम्ही कार्यरत असलेल्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करावं लागतं. स्वतःची ओळख पटल्यानंतर जे दिव्यत्वाचं प्रगटीकरण घडवता येतं त्यातून ‘जगज्जेता’ होता येतं. आपल्या जिवाची बाजी लावून देशासाठी खेळणार्‍या आणि देदीप्यमान यश मिळवणार्‍या अशाच काही क्रीडायोध्यांचा अत्यंत प्रेरणादायी परिचय या पुस्तकातून करून देण्यात आला आहे. चरित्रात्मक लेखनाचा हातखंडा असलेल्या विनोद श्रावणजी पंचभाई यांनी त्यासाठी त्यांचं पूर्ण कसब पणाला लावलं आहे. नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांचं मूल्यमापन करताना त्यांनी आपल्या जगज्जेत्या खेळाडूंची जी यशोगाथा मांडलीय ती सर्वांनाच उभारी देणारी आहे. अत्यंत प्रतिकूलतेत संघर्षमय वाटचाल करणारे आणि राष्ट्रहित जोपासणारे खेळाडू हेच आपले खरे आदर्श आहेत. म्हणूनच हे पुस्तक वाचताना आपल्याला आपल्या सुप्त गुणांची जाणीव होण्याबरोबरच आपले सामर्थ्यही उमगते.

999 in stock

पुस्तकाबद्दल

बॅडमिंटनच्या प्रशिक्षणासाठी घरापासून रोज 56 किलोमिटरचा प्रवास करणारी झुंजार रणरागिणी पी. व्ही. सिंधू, घरी आणलेल्या मिठाईच्या डब्याच्या वेष्टनावरील मुष्टियोद्धा मोहंमद अलीच्या फोटो आणि सामन्याच्या बातमीपासून प्रेरणा घेणारी डॅशिंग लवलिना बोर्गोहेन, होळीनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत सहज गंमत म्हणून संधी मिळाल्यावर आपल्यापेक्षा दीड पट वजन असलेल्या पैलवानाला चितपट करून अस्मान दाखवणारा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया, ‘टोकियो ऑलिंपिकमध्ये मला फक्त सुवर्णपदकच जिंकायचंय’ अशी महत्त्वाकांक्षा बाळगणारा धडाकेबाज रवीकुमार दहिया, अनेक वर्ष अनेक गोष्टींचा त्याग करणारा आणि मोठा लढा देणारा, आपल्या धडाकेबाज खेळामुळे तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर पदकांचा दुष्काळ संपवत घवघवीत यश मिळवणारा आपला हॉकी संघ, सचिन तेंडुलकरच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा भाला सूर्यापर्यंत जाऊन आलाय आणि ज्याने फेकलेल्या भाल्यावर भारताचा तिरंगा गौरवाने फडकतोय तो सुवर्णवेध घेणारा नीरज चोप्रा अशा सगळ्यांचा आपल्या लेखणीने पंचभाईंनी अचूक वेध घेतलाय.

अधिक माहिती

लेखक

विनोद पंचभाई

पाने

80

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “hech-khare-jagjjete”

Your email address will not be published. Required fields are marked *