मेवाडनरेश महाराणा प्रताप

 150.00  135.00

‘भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास’ असं म्हटलं जातं. अशाच संवादाचा पूल निर्माण करून आजच्या अस्थिरतेच्या, कट्टरतावादाच्या काळात महाराणा प्रताप यांच्या देदीप्यमान आयुष्याचा ओझरता परिचय पंचभाईंनी या पुस्तकातून घडवला आहे. अशी पुस्तकं आपल्या संस्कृतीचा वारसा अधोरेखित करीत असल्यानं त्यांचं महत्त्व कालातीत असतं. युगपुरूष छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याप्रमाणेच मेवाडनरेश महाराणा प्रताप यांचाही झंजावात आजच्या पिढीपुढं आला पाहिजे आणि त्यासाठी ही कादंबरी खारीचा वाटा उचलेल याची मला खातरी आहे.

498 in stock

पुस्तकाबद्दल

आपल्याला वर्तमानात चांगलं काम करून भविष्याचा अचूक वेध घ्यायचा असेल तर इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. भूतकाळात घडलेल्या घटनांचा तर्कशुद्ध अभ्यास करून त्यापासून प्रेरणा घेतल्यास शौर्य आणि पराक्रमाची परंपरा कधीही खंडित होणार नाही. झालेल्या चुका टाळणं आणि आपल्यात नवा उत्साह पेरणं याचं अलौकिक काम ऐतिहासिक चरित्रं करतात. प्रस्तुत कादंबरीच्या माध्यमातून लेखक विनोदजी पंचभाई यांनी हाच प्रयत्न केला आहे. ज्यांच्या पराक्रमाच्या कीर्तिचा सुगंध अजूनही भारतवर्षात दरवळत असतो आणि अनेकांना प्रेरणेचा दीप बनत जगण्याची दिशा दाखवतो त्या मेवाडनरेश महाराणा प्रताप यांच्या चरित्र आणि चारित्र्याची झलक या ग्रंथातून अनुभवता येणार आहे.

अधिक माहिती

लेखक

विनोद पंचभाई

पाने

112

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मेवाडनरेश महाराणा प्रताप”

Your email address will not be published. Required fields are marked *