रत्नजडित खंजिराचे रहस्य

Original price was: ₹ 100.00.Current price is: ₹ 80.00.

वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी ‘फितुरी’ हे नाटक लिहिणार्‍या सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांची जवळपास 125 पुस्तके प्रकाशित आहेत. ‘नरभक्षकाच्या बेटावर’ ही कादंबरी त्यांनी सोळाव्या वर्षी लिहिली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या अनेक कलाकृती इंग्रजी भाषेत अनुवादित झाल्या. त्यांचा वाचकवर्ग जगभर निर्माण झाला.

499 in stock

पुस्तकाबद्दल

ऐतिहासिक, सामाजिक, थरार, रहस्य, अद्भुतरम्य, गूढ, वैज्ञानिक, तत्त्वचिंतनात्मक आणि राजकीय कादंबरी लेखनातही त्यांनी वेगळा ठसा उमटविला. साहित्याच्या विविध प्रांतात मनसोक्त मुसाफिरी करतानाच त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर धाडसी भूमिका घेतल्या. भाषाशास्त्रावर पुस्तके लिहिली. जातिसंस्थेचा आढावा घेतला.
‘रत्नजडीत खंजिराचे रहस्य’ या प्रस्तुतच्या किशोर कादंबरीत एका धाडसी आजोबांची कहाणी आहे. आफ्रिकेच्या घनदाट जंगलातील त्यांची कामगिरी बालकुमारांच्या मनात साहस पेरणारी आहे. काय आहे या रत्नजडीत खंजिराचे रहस्य? तो त्यांना कसा मिळाला? त्यांनी नेमका कोणता पराक्रम केला? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
-घनश्याम पाटील