शरीर एक जादूगार

 250.00  200.00

जादूगाराच्या पोतडीतला अनमोल खजिना

श्री. राजेंद्र देशपांडे हे आरोग्याविषयी सजग असलेले नागरिक आहेत. समाज शरीराने आणि मनाने सुदृढ असावा अशी त्यांची आंतरिक इच्छा आहे. याच तळमळीतून त्यांनी आपली जीवनशैली, आहार, वांशिक परंपरा, रुग्णांचे अनुभव यांचा अभ्यास केला. आपले शरीर हेच एक मोठे जादूगार आहे अशी त्यांची धारणा आहे. सकस आहार हेच निरोगी आयुष्याचे सूत्र आहे, याचे त्यांनी अनेक दाखले दिले आहेत.
आपल्या खापर खापर पणजोबांची गोष्ट सांगून ते आपल्याला जागे करतात. मानवी जीवनाचा सुरुवातीचा काळ आणि रोगांची पार्श्वभूमी मांडतानाच त्यांनी रोगाची निर्मिती कशी झाली याचेही वर्णन केले आहे. प्राचीन व आधुनिक जीवनशैलींचा अभ्यास करून त्याचा सुवर्णमध्य कसा साधला जाईल यासाठीचे त्यांचे चिंतन समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

500 in stock

पुस्तकाबद्दल

स्वतः वैद्यकीय पेशाशी संबंधित नसतानाही आरोग्य क्षेत्राविषयी त्यांनी जो अभ्यास केला तो दखलपात्र आहे. शिवाय या विषयावर लिहिताना त्यांनी कुठेही क्लिष्टता येऊ दिली नाही. अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेत त्यांनी जे आरोग्य प्रबोधन केले आहे ते लाखमोलाचे आहे. जे आपण आपल्या शासकीय, प्रशासकीय व्यवस्थेने करायला हवे ते या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याची किमया राजेंद्र देशपांडे यांनी साधली आहे. हे पुस्तक आपण वाचावे, आपले स्नेही, आप्तेष्ट, मित्र परिवार, सहकारी, कर्मचारी यांना प्राधान्याने भेट द्यावे. असे घडले तर ही सुद्धा एक सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल असे मला वाटते. राजेंद्रजी देशपांडे यांना पुढील लेखनप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक

अधिक माहिती

लेखक

राजेंद्र देशपांडे

पाने

128

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शरीर एक जादूगार”

Your email address will not be published. Required fields are marked *