शिवप्रताप

Original price was: ₹ 345.00.Current price is: ₹ 276.00.

मराठी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक पिढ्यांचे श्रद्धास्थान आहेत. उमेश सणस यांनी इतिहासाला कुठेही धक्का न लावता या श्रद्धास्थानाचे व्यक्तिमत्त्व अत्यंत वास्तवपणे वाचकांसमोर मांडले आहे. शिवाजीराजे व अफजलखान यांची भेट हा या कादंबरीचा उत्कर्षबिंदू आहे व त्यानंतरचे युद्ध ही सुद्धा तितकीच कुतुहलाची बाब आहे. या दोन्ही प्रसंगाचे वर्णन सणस यांच्या लेखनातून अत्यंत समर्थपणे झाले आहे.
अत्यंत वेगवान कथानक, ओघवती भाषा, इतिहासाशी प्रामाणिक राहत केलेली घटनांची मांडणी, विविध तऱ्हेच्या व्यक्तिरेखा, प्रतापगड व परिसराचे जिवंत वर्णन, शिवाजीराजांच्या कल्पकतेचे वर्णन करणारे असंख्य प्रसंग, सामान्य रयतेचे शिवाजी राजांवरील प्रेम दाखवणाऱ्या घटना व इतर असंख्य प्रकारची अज्ञात असलेली माहिती या कादंबरीच्या रूपाने उमेश सणस यांनी हळुवारपणे रेखाटली आहे. ‘शिवप्रताप’ ही कादंबरी वाचकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाते.

Out of stock

पुस्तकाबद्दल

Shivpratap, शिवप्रताप, Buy marathi kadambari Shivpratap online from Chaprak Bookstore.