पुस्तकाबद्दल
ऐतिहासिक काळात आणि पेशवाईतसुद्धा, प्रतिष्ठित लोक बखरी लिहून ठेवत असत. सभोवतालच्या सामाजिक घडामोडींबरोबरच स्वत:च्या घराण्याची आणि स्वत:ची माहिती त्यामध्ये लिहून ठेवत असत. अशा बखरी वंशजांना उपयोगी पडतील आणि म्हणून आजच्या काळातही सर्वांनी आत्मकथन लिहून ठेवावं असं मागे एकदा दत्तो वामन पोतदार म्हणाले होते आणि ‘तारेवरची कसरत’ ही रविंद्र कामठे यांनी लिहिलेली आत्मकथा आणि ‘चपराक प्रकाशन’चे संपादक घनश्याम पाटील यांनी प्रसिद्ध केलेली आत्मकहाणी ही अशीच वाचण्यासारखी आहे.
या आत्मकथनात कामठे यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात आलेले बालपणापासूनचे प्रसंग मांडलेले आहेत. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. काही कटू प्रसंगांचा अनुभव लिहिताना त्यांना मानसिक त्रासही झाला आहे. अतिशय कडू अनुभव त्यांनी लिहिलेले नाहीत; मात्र कामठे यांनी कुणाबद्दल वाईट लिहिलेलं नाही. त्यांनी जीवनमूल्यांचा अंगीकार केला.
Reviews
There are no reviews yet.