ते दिवस आठवून बघ

 140.00  112.00

डॉक्टर अशोक शिंदे स्वतः नॉस्टॅल्जिक असल्यामुळे त्यांची कविता गतस्मृतींना उजाळा देत राहते. उत्तम संस्कारांची पेरणी करता करता नीतिमत्तेचे भान त्यांची कविता जागृत करते. माणुसकीचा निर्मळ झरा होऊन ती वाहत राहते. ती चिंतनशील आहे. समर्पणाचं अगत्यशील जागरण करणारी डॉक्टरांची कविता प्रकाशवाटेचा अविरत शोध घेणारी कविता आहे. थोरामोठ्यांच्या अनमोल योगदानाचं गुणगान करणारी ही कविता आहे. आईवडिलांचं ऋण व्यक्त करणारी ही कविता देशप्रेमाचा जागर करणारी आहे. सरळ, साधं समर्पित आयुष्य जगताना जो ‘निचोड’ शिल्लक राहतो, जो ‘सार’ वाट्याला येतो त्याचा भावार्थ सांगणारी प्रस्तुत संग्रहातील ही सारांशात्मक, प्रातिनिधीक कविता आहे. डॉक्टर शिंदे यांनी कुठलीही ‘पोज’ घेतलेली नाही. फुकटचा आव आणून कवितेचा कुठलाही शब्द त्यांनी लिहिलेला नाही. त्यांच्या जगण्याशी एकनिष्ठ असणारी त्यांची कविता म्हणूनच भावपूर्ण आहे.

997 in stock

पुस्तकाबद्दल

सरळ, साध्या, सोप्या शब्दांनी डॉक्टर शिंदे यांची कविता अलंकृत असल्यामुळे ती वाचनीय झालेली आहे. सर्वच कविता मुळातूनच वाचाव्या इतक्या सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. काळजाला सरळ सरळ हात घालणार्‍या आहेत. डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्‍या आहेत. रोजच्या जगण्यातले संदर्भ कवितेत डोकावत असल्यामुळे ती परकी वाटत नाही. ‘सुई दोरा’ या कवितेतून पती-पत्नीच्या नात्यातील गहिरा भाव ते व्यक्त करतात आणि जीवनाचं सहजसोपं तत्त्वज्ञान साध्या शब्दात अधोरेखित करतात.

अधिक माहिती

कवी

डॉ. अशोक शिंदे

पाने

96

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ते दिवस आठवून बघ”

Your email address will not be published. Required fields are marked *