पुस्तकाबद्दल
या संग्रहात असणाऱ्या सर्वच कविता या अतिशय साध्या-सोप्या शब्दात मुलांशी हितगुज करतात. त्यातले विषय मुलांच्या आवडीचे आहेत. त्यामुळे मुलांना या कवितांचा नक्कीच लळा लागेल; यावर माझा विश्वास आहे. मुलांनी माकड पाहिले आहे, रस्त्याचे काम होताना पाहिले आहे, किचन आणि किचनमधल्या गोष्टीही त्यांनी रोज पाहिल्या आहेत. फळं, फुलं, भाज्या, नदी, डोंगर पाहिले आहेत. पाऊस पाहिला आहे, डॉक्टरही पाहिलेले आहेत. या रोजच्या अनुभवातील, परिघातील गोष्टींना राजेंद्र उगले यांनी मोठ्या खुबीने या बालकवितांमध्ये स्थान दिले आहे. पाणीपुरी, मिसळ हे तर मुलांचे अतिशय आवडीचे विषय. त्याचीही कविता ‘थांब ना रे ढगोबा…’मध्ये मुलांना वाचावयास मिळते.
Reviews
There are no reviews yet.