पुस्तकाबद्दल
पुरूष… त्याच्या जन्मापासून त्याचा स्त्रीशी संबंध येतो. ‘ती’ आहे म्हणून आपण आहोत. माता आणि माती यात एका वेलांटीचा तर फरक असतो. या फरकातले अंतर म्हणजे आपले जीवन. ते जगताना आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींचे महत्त्व कळतेच असे नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर श्वासोच्छवास! त्याशिवाय आपण जगणार नाही हे माहीत असूनही आपण तिकडे गंभीरपणे लक्ष देतोच असे नाही. अगदी तसेच स्त्रीचेही! स्त्रीशिवाय आपणास पूर्णत्व नाही. नाते कोणतेही असो पण ‘ती’च आपल्याला तारते. तिच्या मनात चाललंय तरी काय याचा वेध घेणं खरंतर परमेश्वरालाही शक्य नाही. स्त्रियांना सन्मान देणे, त्यांना समजून घेणे यापेक्षा मोठी पूजा कोणती असू शकते? ‘ती’च्या मनातलं या पुस्तकाच्या निमित्तानं ही पूजा बांधलीय विनोद श्रा. पंचभाई यांनी. यातील कर्तबगार स्त्रियांचा संघर्ष निश्चितच प्रेरणादायी आहे.
Reviews
There are no reviews yet.