वाटेवरच्या मशाली

Original price was: ₹ 250.00.Current price is: ₹ 200.00.

या लेखांची भाषा प्रवाही आहे. आवश्यक तिथे त्यांनी कवितांची पखरण केल्याने शब्दसौंदर्यात आणखी भर पडलीय. तीन-चार मिनिटांत एक लेख वाचून होतो. वाचताना कंटाळा तर येत नाहीच पण वाचक अंतर्मुख होऊन विचार करतो. भवतालाचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर साकारते आणि त्यात तो आपले स्थान शोधू लागतो. काही मिनिटांसाठी का असेना पण त्याला रोजच्या रहाटगाड्याच्या चिंतेपासून दूर नेत, त्याच्या आतल्या आवाजाला प्रभावीपणे साद घालत वेगळ्या विश्वात नेण्याचे कसब लेखिकेला जमले आहे. कोणत्याही कलाकृतीचे यापेक्षा मोठे यश ते कोणते?

500 in stock

पुस्तकाबद्दल

प्रस्तुत पुस्तकातील 55 लघुलेखांद्वारे लेखिकेने जे चिंतन मांडले आहे ते वाचकांचे प्रबोधन करणारे आहे. सामाजिक जाणिवा समृद्ध करणार्‍या या लेखांच्या माध्यमातून सुजाताताईंनी समाजशिक्षकाची भूमिका पार पाडलीय. यातून स्त्रियांचे प्रश्न, शिक्षण विचार, संस्कार, नवा भारत, कोविडच्या काळाचे चित्रण, लोकशाही, घरपण, वृद्धावस्था, प्रेरणा, मृत्युविचार, पुरस्कारांचे राजकारण, प्रसारमाध्यमे, स्वप्रतिमा, ग्रंथश्रेष्ठता, निरोप, वाचन हे व असे चौफेर चिंतन आहे.