पुस्तकाबद्दल
आपल्याला वर्तमानात चांगलं काम करून भविष्याचा अचूक वेध घ्यायचा असेल तर इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. भूतकाळात घडलेल्या घटनांचा तर्कशुद्ध अभ्यास करून त्यापासून प्रेरणा घेतल्यास शौर्य आणि पराक्रमाची परंपरा कधीही खंडित होणार नाही. झालेल्या चुका टाळणं आणि आपल्यात नवा उत्साह पेरणं याचं अलौकिक काम ऐतिहासिक चरित्रं करतात. प्रस्तुत कादंबरीच्या माध्यमातून लेखक विनोदजी पंचभाई यांनी हाच प्रयत्न केला आहे. ज्यांच्या पराक्रमाच्या कीर्तिचा सुगंध अजूनही भारतवर्षात दरवळत असतो आणि अनेकांना प्रेरणेचा दीप बनत जगण्याची दिशा दाखवतो त्या मेवाडनरेश महाराणा प्रताप यांच्या चरित्र आणि चारित्र्याची झलक या ग्रंथातून अनुभवता येणार आहे.
Reviews
There are no reviews yet.