पुस्तकाबद्दल
हा कवी मागास भागातून येत आयटी क्षेत्रात पाय रोवतो, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियन इंटिलिजन्ससारख्या अत्याधुनिक ज्ञानक्षेत्रात पाऊल रोवतो आणि तरीही आधुनिक संस्कृतीचा नाटकी भाग न बनता आपला अस्सल मराठमोळा भावनाकंद जपत आपल्याच भाषेत आणि शैलीत कवितांतून व्यक्त होतो ही महत्त्वाची बाब आहे. अनेक कवी अनुकरणाच्या आहारी जात अस्सलपणा हरपून बसतात. ते आटकळेंनी केले नाही. भविष्यातही ते लिहित राहतील. लिहावे. आपली शैली स्वतंत्र रूप न सोडता पुढे विकसित करत नेत आज हरपत चाललेल्या ग्रामीण साधेपणाचे विलोभनीय दर्शन काव्यातून, कथांतून घडवत रहावे ही अपेक्षा आणि शुभेच्छा!
-संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक
Reviews
There are no reviews yet.