पुस्तकाबद्दल
कविता हा साहित्यातील अभिव्यक्तिचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असतो. त्यातही चारोळ्या लिहिण्यासाठी तर जीवनानुभव आणखी समृद्ध असावे लागतात. आपले अनुभव, आपली अनुभूती आणि चिंतन चार ओळीत मांडून वाचकांचे मनोरंजन करणे, त्यांना माहिती देणे, ज्ञान देणे हे सोपे काम नसते. ज्यांची प्रतिभाशक्ती अस्सल आहे तेच हे धाडस पेलू शकतात. ठोकळेबाज विचारसरणीच्या दुष्ड्डाचार्य समीक्षकांनी चारोळी या साहित्यप्रकाराची म्हणावी तशी दखल घेतली नसली तरी हा साहित्यप्रकार कमालीचा वाचकप्रिय आहे. आपल्या भावना नेमक्या शब्दात मांडण्यासाठी चारोळ्या उपयुक्त ठरतात. शकुंतला काळे- गावडे यांनी या चारोळीसंग्रहातून दिलेला विचार, मांडलेले तत्त्वज्ञान म्हणूनच दखलपात्र आहे.
– घनश्याम पाटील
Reviews
There are no reviews yet.