मनापासून

Original price was: ₹ 200.00.Current price is: ₹ 160.00.

एखादी जाणकार व्यक्ती आपणास काही सांगत असेल तर ते काळजीपूर्वक ऐकायला हवं. त्यातही त्या व्यक्तिची थोडीथोडकी नव्हे तर तब्बल पंचवीस पुस्तकं प्रकाशित असतील, समाजाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन व्यापक, उदात्त असेल, आपल्या संस्कृतीवरील त्यांच्या श्रद्धा दृढ असूनही ते कर्मकांडापासून दूर असतील आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे समाजाविषयीच्या कळवळ्यातून त्यांचं सांगणं ‘मनापासून’ असेल तर आपल्याला ते ऐकायलाच हवं. सातारा येथील ज्येष्ठ लेखक डॉ. राजेंद्र माने यांच्यात या सगळ्या खुबी आहेत आणि म्हणूनच समाजाला अधिकारानं चार चांगल्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे.

500 in stock

पुस्तकाबद्दल

यातील लेखांना भावनांचा ओलावा आहे. मराठमोळ्या मातीचा गंध आहे. वाचकांच्या मनाची पकड घेईल अशा लेखनशैलीचा आविष्कार आहे. अंतर्मुख करायला भाग पाडणाऱ्या घटना घडामोडींचा उहापोह आहे आणि हे सगळं नेमक्या शब्दांत आहे. प्रत्येक लेख चुटकीसरशी वाचून व्हावा आणि त्या लेखातून आपला आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा असं शब्दसंचित डॉ. राजेंद्र माने यांच्या लेखणीत आहे. मुळातच त्यांचं जीवनानुभव समृद्ध आहे आणि मनाची निर्मळता, पवित्रता त्यांनी जपलीय, जोपासलीय. या सगळ्याचा पाझर त्यांच्या शब्दाशब्दातून फुटलाय. त्यामुळंच या पुस्तकातील लेख आपल्याला वाचनानंद देण्याबरोबरच माणूस म्हणून समृद्ध करतात. कोणत्याही जिंदादिल माणसाच्या मनात ‘मनापासून मुळे चैतन्याचे नंदादीप प्रज्वलित होतील याची मला खातरी आहे.
– घनश्याम पाटील