पाटी पेन्सिल

Original price was: ₹ 250.00.Current price is: ₹ 200.00.

या पुस्तकात लेखन करताना शिक्षणाच्या विविध अंगाने केलेला विचार महत्त्वाचा आहे. शिक्षणावरील अनेक समित्या, आयोगाच्या शिफारसी, शिक्षणाच्या भौतिक सुविधा, शिक्षणाची गुणवत्ता यावर शासकीय, अशासकीय संस्थांची सर्वेक्षणे, त्यांचे अहवाल लक्षात घेऊन मांडणी करण्यात आली आहे. शिक्षणातील विविध घटक जसे विद्यार्थी, शिक्षक, पालक स्वयंसेवी संस्था यांची भूमिका याबाबतचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातील विविध लेखांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी आवश्यक ते संदर्भ लेखाच्या अनुषंगाने वेळोवेळी दिलेले आहेत.

995 in stock

पुस्तकाबद्दल

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणी संदर्भात शिक्षणातील विविध घटकांची जबाबदारी आणि कर्तव्ये, अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि त्यासाठीची विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती, कालानुषंगिक बदल, माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर याच्यावरही त्यांनी अत्यंत उत्तम मांडणी केली आहे. संदीप वाकचौरे यांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव, अभ्यास आणि व्यासंगाच्या आधारे केलेले भाष्य वाचकांना निश्चित विचार करण्यास भाग पाडते.